मोहाली :  ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २१ धावांनी पराभव करून सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने या विजयासह रन रेटच्या आधारावर दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. 


रन रेटचा खेळ खल्लास 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता ऑस्ट्रेलियाचे ३ सामन्यात दोन सामने जिंकून ४ गुण आहेत आणि भारताचेही तीन सामन्यात दोन सामने जिंकून ४ गुण आहेत. त्यामुळे पुढील सामना जो जिंकेल तो सेमी फायनलमध्ये जाईल हे साध आणि सोपं गणित झालं आहे. 


जेम्स फॉकनर यांच्या धारदार गोलंदाजीमुळे आणि कर्णधार स्वीव्ह स्मिथ यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २१ धावांनी पराभव केला. 


ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान समोर आजच्या सामन्यात १९४ धावांचे कठीण आव्हान दिले होते. पाकिस्तान या धावांचा पाठलाग करताना  ८ बाद १७२ धावांपर्यंत मजल मारता आली.  पाकिस्तानकडून सर्वाधिक खालिद लतिफ याने ४६ धावा केल्या तर जेम्स फॉकनर याने शानदार कामगिरी करत ५ विकेट घेतल्या. 


सुरूवातीला ऑस्ट्रेलियाने १९३ धावा करताना कर्णधार स्मिथ याने ६१ धावा केल्या. तर त्याला निवृत्तीचे वेध लागलेल्या शेन वॉटसनने ४४ धावांची अनमोल साथ दिली. पाकिस्तानकडून वहाब रियाद आणि इमाद वासिम यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.