जडेजाच्या लग्नासाठी धोनी, रैनाला निमंत्रण नाही पण...
हरभजन सिंग, रोहित शर्मानंतर भारताचा आणखी एक क्रिकेटपटू आता लग्नबंधनात अडकतोय. भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आयुष्यातील नवी इनिंग खेळण्यास सज्ज झालाय.
मुंबई : हरभजन सिंग, रोहित शर्मानंतर भारताचा आणखी एक क्रिकेटपटू आता लग्नबंधनात अडकतोय. भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आयुष्यातील नवी इनिंग खेळण्यास सज्ज झालाय.
पाच फेब्रुवारीला जडेजाचा त्याची मैत्रिण रिभाभा हिच्याशी साखरपुडा झाला होता. येत्या १७ एप्रिलला तो लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्याच्या लग्नाची तयारीही सुरु झालीये.
त्याच्या लग्नाला अनेक क्रिकेटपटू हजर राहणार आहेत. मात्र या लग्नासाठी महेंद्रसिंग धोनी आणि रैनाला निमंत्रणच देण्यात आलेले नाही. आता जडेजाने असे केले म्हणजे त्यांच्यात काही बिनसलेय का असं काही तुमच्या मनात आलं असेल तर तसं काही नाहीये. न बोलावताही आपल्या मित्राच्या आनंदात सहभागी होणारे खूप कमी असतात. यात आता धोनी, रैनाचा समावेश होतो.
'मी, धोनी आणि रैना आयपीएलमध्ये आतापर्यंत सीएसकेकडून एकत्र खेळायचो. त्यामुळे आमची जवळीक आहे. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. त्यामुळे हे माझे मित्र निमंत्रणाशिवाय माझ्या लग्नाला येतील,' असे जडेजाने सांगितले.
राजकोटमध्ये जडेजा आणि रिवाबाचा विवाहसोहळा पार पडणार आहे. जडेजाच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होतेय. लग्नाआधीच जडेजाला त्याच्या सासऱ्यांकडून ऑ़डी कार गिफ्ट मिळालीये.