नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन मीडियामधून भारताचा कर्णधार विराट कोहलीवर टीका केली जात असतानाच आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँड यांनी कोहलीवर निशाणा साधलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कदाचित कोहलीला सॉरी म्हणणे येत नसावे. मला नाही वाटतं त्याला सॉरी या शब्दाची स्पेलिंगही येत असावी, अशा शब्दात सदरलँड यांनी कोहलीवर टीका केली. ऑस्ट्रेलियामध्ये एका रेडिओ स्टेशनशी बातचीत करताना त्यांनी ही टीका केली. 


बंगळूरुमधील कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या ईमानदारीवर प्रश्नचिन्हा उपस्थित केल्याप्रकरणी विराटने माफी मागितली पाहिजे, असेही सदरलँड म्हणाले. बंगळूरु कसोटीदरम्यान स्मिथने डीआरएस घेताना ड्रेसिंग रुमकडे पाहिले होते. याकारणावरुन स्मिथला कोहलीने बेईमान म्हटले होते.