कोलकाता : भारत पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे एक वेगळाच उत्साह असतो. त्यात हा सामना विश्वचषकाचा असेल तर पाहायलाच नको. पण, आजचा सामना मात्र एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. आता भारतासाठी ही मॉडेल न्यूड होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान टी-२० संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्यापासून आपण गरोदर असल्याचे आर्शी खान या भारतीय मॉडेलने म्हटले होते. तेव्हापासून ती चर्चेत आलीये. आता मात्र आर्शी खानने देशभक्ती आणि आफ्रिदी प्रेम यांच्यात ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केलाय असं वाटतंय. 


आर्शी खानने आता ट्वीट करुन आपण कपडे उतरवणार असल्याची गोष्ट केली आहे. 'भारत जिंकला तर आपण आपल्या शरीराची पाठची बाजू एक्सपोज करू आणि शाहिद आफ्रिदीने शतक केल्यास आपण आपल्या शरीराची पुढील बाजू एक्सपोज करू' असं तिने म्हटलंय. 


पाकिस्तानी पूनम पांडे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंदील बलोचनेसुद्धा पाकिस्तान जिंकल्यास आपण देशापुढे स्ट्रिप डान्स करू असे म्हटले होते. आता तिला टक्कर देऊन आर्शी जास्तीत जास्त प्रसिद्धी तर मिळवू पाहात नाहीये ना, अशी शंका सर्वांना येतेय.