मुंबई :  टीम इंडियातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहलीला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. अखिल भारतीय क्रीडा महासंघाने ही मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट हा टीम इंडियाचा कर्णधार आहे, सर्वांत लोकप्रिय फलंदाज म्हणून त्याला पसंती आहे. 


अखिल भारतीय क्रीडा महासंघाने 'भारतरत्न'ने विराटचा गौरव करण्याची मागणी केली आहे. 


अखिल भारतीय क्रीडा महासंघाने याबाबत गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे निवेदन दिले आहे. 


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसारखीच कोहलीची कामगिरीही विराट असल्याचे म्हणत सचिनपेक्षा काही बाबतीत विराट अव्वल असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.


विराट कोहलीला हा पुरस्कार मिळाल्यास सचिन तेंडुलकरनंतर हा पुरस्कार मिळविणारा तो दुसरा क्रिकेटपटू ठरेल. कोहलीने आतापर्यंत ४१ कसोटी, १७१ एकदिवसीय आणि ४३ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.


भारतातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही विराटने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ट्वेंटी-20 विश्वकरंडकातील त्याच्या कामगिरीची दखल जागतिक पातळीवर घेतली आहे. कोहलीची फलंदाजीची सरासरी जगात सर्वोत्तम आहे.