मुंबई : 2007मधील पहिल्या टी-20 मधील फायनलचा तो क्षण आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झाला होता. अखेरच्या षटकांत विजयासाठी पाकिस्तानला 13 धावा हव्या होता तर त्यांच्याकडे एक विकेट शिल्लक होती. 


जोगिंदर शर्माकडे बॉलिंग देण्यात आली होती. पहिला बॉल वाईड झाला. दुसरा बॉल डॉट गेला. तिसऱ्या बॉलमध्ये मिसबाहने षटकार ठोकला. चौथ्या चेंडूतही मिसबाह षटकार ठोकण्याच्या तयारीत होता मात्र त्याचवेळी त्याने टोलवलेला चेंडू श्रीसंतच्या हातात विसावला आणि भारताने पाकिस्तानला नमवत पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले.


पाहा हा व्हिडीओ