नवी दिल्ली : भारताची अव्वल शटलर पी.व्ही सिंधूनं इंडियन ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. अतिशय रंगतदार मुकाबल्यात सिंधूं 21-18, 14-21, 21-14 नं बाजी मारली.


सिंधूनं दक्षिण कोरियाच्या द्वितीय मानांकित त्सुंग जी ह्यूवर मात करत फायनलमधील आपला प्रवेश निश्चित केला. आता फायनलमध्ये सिंधूला आव्हान असणार आहे ते अव्वल सीडेड स्पेनच्या कॅरोलिना मरिनचं. रियो ऑलिम्पिकमध्ये मरिननं सिंधूचं गोल्ड मेडलचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नव्हतं. आता सिंधू ऑलिम्पिक फायनलच्या पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशानचं बॅडमिंटन कोर्टवर उतरेल.