रिओ : साक्षी मलिकनं कुस्तीमध्ये भारताला ब्राँझ मेडल पटकावून दिलं आहे. यानंतर आता बॅडमिंटनमध्ये पी.व्ही.सिंधूकडून सगळ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. पी.व्ही.सिंधूची सेमी फायनल थोड्याच वेळामध्ये सुरु होणार आहे. सिंधूची टक्कर जपानच्या नोझोमी ओकुहाराबरोबर होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पी.व्ही.सिंधू ही मॅच जिंकली तर तिची फायनलमध्ये एन्ट्री होईल आणि भारताचं गोल्ड किंवा सिल्व्हर मेडल निश्चित होई. सिंधू ही मॅच जर ही मॅच हरली तर तिला ब्राँझ मेडलसाठी चीनच्या झुरुईबरोबर खेळावं लागेल. 


काही वेळापूर्वीच झालेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये स्पेनच्या कारोलिना मरिननं झुरुईचा पराभव करत फायनल गाठली आहे. या मॅचवेळी झुरुईच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे झुरई रिटायर हर्ट झाली, पण काही वेळानंतर झुरई पुन्हा खेळायला आली, पण यामध्ये तिचा पराभव झाला. 


ब्राँझ पदकासाठी झुरईबरोबरचा सामना उद्या होणार आहे. यामुळे झुरईचं एका दिवसामध्ये फिट होणं कठीण मानलं जात आहे. झुरईला सिंधू किंवा नोझोमी विरुद्ध ब्रॉन्झ पदकासाठी खेळावं लागेल. त्यामुळे पूर्णपणे फिट नसलेल्या झुरईला हरवत ब्राँझ मेडल पटकवणं सोपं मानलं जात आहे. या सगळ्या शक्यतांमुळे भारताचं यंदाच्या ऑलिम्पिकमधलं दुसरं पदक जवळपास निश्चित मानलं जात आहे.