पाकिस्तानची टीम भारतात दाखल
टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम कोलकत्यामध्ये पोहोचली आहे.
कोलकता: टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम कोलकत्यामध्ये पोहोचली आहे. टीम कोलकत्यामध्ये आली तेव्हापासूनच त्यांना चोख सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये 19 मार्चला इडन गार्डनवर मॅच होणार आहे. याआधी हीच मॅच हिमाचल प्रदेशच्या धर्मशालामध्ये होणार होती. पण सुरक्षेच्या कारणामुळे मॅच इडन गार्डनवर हलवण्यात आली.
सुरक्षेचं कारण देत पाकिस्तान टीमनं भारतात येण्याबाबत आडमुठी भूमिका घेतली होती. पण पाकिस्तान ही स्पर्धा खेळायला भारतात आलं नसतं तर त्यांना तब्बल 15 मिलियन अमेरिकन डॉलर एवढं नुकसान झालं असतं. त्यामुळे अखेर भारतामध्ये यायचा निर्णय पाकिस्ताननं घेतला.