इस्लामाबाद : उरी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे 7 तळ उद्धवस्त केले. यात तब्बल 38 दहशतवादी मारले गेले. भारताच्या या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानचा ऑलराऊंडर क्रिकेट शाहीद आफ्रीदी आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रीदीने दिलेल्या प्रतिक्रियेची मोठी चर्चाही ही झाली होती. मात्र आता आफ्रीदीने याप्रकरणी केलेल्या वक्तव्यातून तिने भारताला धमकी दिलीये.


आफ्रीदीने ट्विटरवरुन यापूर्वी सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलताना पाकिस्तान हा शांतीप्रिय देश आहे. जी गोष्ट चर्चेने होऊ शकते त्यासाठी इतके मोठे पाऊल उचलण्याची गरज नाही. पाकिस्तानला सर्व देशांसोबत मैत्रीचे संबंध ठेवायचे आहेत. इतकचं बोलून तो थांबला नाही तर जेव्हा दोन शेजारी एकमेकांशी लढतात तेव्हा त्या दोन घरांचेच नुकसान होते, असे त्याने ट्विट केले होते.


मात्र आता त्याने भारताला धमकीच दिलीये. एका पाकिस्तानी टीव्ही शोदरम्यान आफ्रीदीच्या ट्विटबद्दल चर्चा झाली. यावेळी तुझ्या ट्विटवरुन आफ्रीदी भारताला घाबरला अशी चर्चा भारतात होत आहे यावर तुझे काय म्हणणे आहे असे आफ्रीदीला विचारले असता तो म्हणाला, भारतीयांना हे नाही माहीत की पाकिस्तानी लष्कराच्या पुढे पठाण उभे असतात. सर्व सीमांचे रक्षण पठाण करतात.