मुंबई: मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स यांच्यामधल्या वानखेडे स्टेडियमवरच्या मॅचमध्ये हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे मैदानात उतरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिझनसाठी कृणाल पांड्याला मुंबई इंडियन्सनं तब्बल 2 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. तर हार्दिकला मुंबईनं 2015 च्या लिलावामध्ये 10 लाख रुपयांना विकत घेतलं होतं. 


हार्दिक पांड्या भारताकडून यंदाचा टी 20 वर्ल्ड कप खेळला आहे, तर कृणाल पांड्या आत्तापर्यंत 4 फर्स्ट क्लास मॅच खेळला आहे. यामध्ये त्यानं 59 रन केल्यात आणि 5 विकेट्स घेतल्या आहेत. तर बडोद्याकडून कृणाल 15 टी 20 मॅच खेळला आहे, यामध्ये त्यानं 167 रन केल्या आणि 16 विकेट घेतल्या होत्या.