सीरीज अर्धवट सोडून युनूस माघारी
पाकिस्तानचा टीमचा माजी कर्णधार युनूस खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.
इस्लामाबाद : पाकिस्तानचा टीमचा माजी कर्णधार युनूस खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. फैसलाबाद येथे सुरु असलेल्या पाकिस्तान कप वनडे टूर्नामेंटदरम्यान पंचाच्या निर्णयावर वाद घालत तो मध्येच स्पर्धा सोडून घरी परतल्याने त्याच्यावर बंदी घालण्याची शक्यता आहे.
सामन्यादरम्यान युनूसच्या काही निर्णयांमुळे अंपायर आणि त्यानंतर मॅच रेफ्री अजीज उर रहमान यांच्याशी वाद झाला. मॅच रेफ्रीने त्याला दंडात्मक कारवाईसाठी बोलावले मात्र त्याच्या न येण्यामुळे त्याला १०० टक्के दंड ठोठावण्यात आला.
ही घटना युनुस नेतृत्व करत असलेल्या खैबर पख्तुनवालाच्या दोन संघातील सामन्यादरम्यान झाली. सूत्रांच्या मते पीसीबीचे प्रमुख शहरयार खान यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून मॅच रेफ्रींकडून या प्रकऱणी रिपोर्टही मागवला आहे.