पेप्सीचा धोनीबरोबरचा करार 11 वर्षानंतर संपुष्टात
भारताचा वनडे आणि टी-20 टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा पेप्सिको कंपनीसोबत असलेला करार 11 वर्षानंतर संपुष्टात आला आहे.
मुंबई : भारताचा वनडे आणि टी-20 टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा पेप्सिको कंपनीसोबत असलेला करार 11 वर्षानंतर संपुष्टात आला आहे. कंपनीनं मात्र विराट कोहलीबरोबरचा करार कायम ठेवला आहे.
मागच्या 11 वर्षांपासून धोनी पेप्सी आणि लेजच्या जाहिरातींमध्ये दिसून येत होता. सध्या पेप्सिकोबरोबर विराट कोहली, रणबीर कपूर आणि परिणीती चोप्रा हे करारबद्ध आहेत. फोर्ब्स मॅगझिननं 2016 मध्ये प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये धोनी हा जाहिरातींसाठी सर्वाधिक पैसे घेणारा खेळाडू असल्याचं म्हटलं होतं.