बंगळूरू : महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाच्या झंझावाती खेळीनंतर युझवेंद्र चहलच्या फिरकीच्या जादूने भारताने तिसऱ्या आणि निर्णायक टी-२०मध्ये इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला. भारताने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ७५ धावांनी विजय मिळवत टी-२० मालिका २-१ अशी खिशात घातली. तिसऱ्या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो युझवेंद्र चहल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याने जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर सहा विकेट घेत भारताला विजय मिळवून गिला. खरंतर या सामन्याचा हिरो असलेला युझवेंद्र क्रिकेटआधी बुद्धिबळ खेळत असे. सातव्या वर्षापासून त्याने बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली होती. 


त्याने १२ वर्षाखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धाही जिंकलीये. याशिवाय १६ वर्षाखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतही त्याने भाग घेतला होता. चहल हरियाणाचा रहिवासी आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली तो आरसीबीकडून खेळलाय.