नेपीयर :  आयपीएल आणि टी-२० फॉर्मेटमध्ये प्रत्येक दिवशी रेकॉर्ड बनतात आणि तुटतात. सहा चेंडूत सहा षटकार लगावण्याचा असा एक विक्रम सिक्सर किंग युवराज सिंग याने २००७ मध्ये वर्ल्ड टी २०मध्ये बनविला होता. 


कोण आहे तो विक्रमवीर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवराज सिंग यांच्या या विक्रमाची बरोबरी एका १९ वर्षीय मुलाने केली आहे. न्यूझीलंडचा टीनएजर ग्लेन फिलिप्सने इंग्लडच्या क्रिकेट इतिहासात नवा मैलाचा दगड गाठला आहे. ऑकलंडच्या या विकेट किपर फलंदाजाने एका ओव्हरमध्ये लागोपाठ सहा षटकार लगावून क्रिकेट जगतात आपल्या येण्याचे संकेत दिले आहे.


कुठे केली ही कामगिरी 


इंग्लडमधील अरुंडेल क्रिकेट मैदानावर ग्लेनने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.  या मैदानावर १८९५ पासून सामने आयोजित करण्यात येत आहेत. 


किती धावा केल्या फिलिप्सने...


फिलिप्सने  १२३ चेंडूत २०१ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यांच्या संघाने २९९ धावा बनविल्यावर डाव घोषीत केला. सामना संपला तेव्हा नोरफॉल्क इलेवन यां संघाने ७ विकेटवर १७४ धावा बनविल्या होत्या. शेवटी मॅच ड्रॉ घोषित करण्यात आली. 


तिघांच्या नावावर यापूर्वीचा विक्रम....


यापूर्वी असा कारनामा केवळ तीन फलंदाजांनी केला आहे. यात भारताचा युवराज सिंग, द.आफ्रिकेचा हर्शल गिब्स आणि किरॉन पोलार्ड यांनी केला आहे.  गिब्सने हॉलंड विरूद्ध २००७ मध्ये वर्ल्ड कप दरम्यान ही कामगिरी केली होती. तर भारताचा सिक्सर किंग याने २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप दरम्यान ही कामगिरी केली होती. तसेच किरॉन पोलार्ड यांनी २०१४ मध्ये बिग बॅश लिगमध्ये सहा सिक्सर लगावले होते.