इंदूर :न्यूजीलंड विरोधातील तिसऱ्या टेस्टमध्ये भारताने विजय मिळवला. सोबतच आर. अश्विनने एक नवा रेकॉर्ड सुद्धा केला आहे. अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये 21 वेळा पाचहून अधिक विकेट घेणारा चौथा भारतीय क्रिकेटर बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विनने हा रेकॉर्ड इतर क्रिकेटरांच्या तुलनेने सर्वात जलद केला आहे. कपिल देवने 23, हरभजन सिंहने 25 आणि अनिल कुंबळेने 35 वेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर प्रस्थापित केला आहे.


39 टेस्ट खेलेलेल्या अश्विनने आत्तापर्यंत 220 विकेट घेतल्या आहेत. 39 टेस्ट खेळणाऱ्या इतर कोणत्याही बॉलरपेक्षा अश्विनचा बा चांगला रेकॉर्ड आहे. याआधी वकार युनूसने करिअरच्या सुरुवातीला 39 टेस्टमध्ये 208 विकेट घेतले होते.


अश्विनने सगळ्यात कमी मॅच खेळत 21 वेळा हा रेकॉर्ड केला आहे. असं करणारा अश्विन जगातील तीसरा बेस्ट बॉलर बनला आहे. अश्विनच्या आधी इंग्लंडच्या सिडनी बारनेसने 25 टेस्ट आणि न्यूजीलंडच्या क्लैरी ग्रिमेटने 37 टेस्टमध्ये 20 किंवा त्याहून अधिक वेळा 5 विकेट घेतल्या आहेत.