मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अश्विननं विश्व विक्रम केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला आहे. तर आंतरराष्ट्रीय बॉलर्समध्ये अश्विन जलद 200 विकेट घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा विक्रम करायला अश्विनला 37 टेस्ट लागल्या. ऑस्ट्रेलियाच्या क्लॅरी ग्रिमेटनं 36 टेस्टमध्ये 200 विकेटचा पल्ला गाठला होता. हेच रेकॉर्ड करायला डेनिस लिली आणि वकार युनुसला 38 टेस्ट तर डेल स्टेनला 39 टेस्ट लागल्या होत्या.


आयसीसीने जाहीर केलेल्या टेस्ट रँकिंगमध्ये अश्विनने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये १० विकेट घेतले होते. यामुळेच अश्विनने ८७१ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला एक अंकाने मागे टाकत त्याने दुसरा क्रमांक मिळवला. अश्विन हा पहिल्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिेकेच्या डेल स्टेनपासून फक्त ७ गुणांनी मागे आहे. याशिवाय अश्विन टेस्ट ऑलराउंडर रँकिंगमध्ये ४५० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.