दुसऱ्या टी-२०मध्ये लोकेशने रचला इतिहास, सेहवागलाही टाकले मागे
भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने रविवार नागपूरमधील दुसऱ्या टी-२०मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नवा इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक स्कोर करणारा तो पहिला फलंदाज ठरलाय.
नागपूर : भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने रविवार नागपूरमधील दुसऱ्या टी-२०मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नवा इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक स्कोर करणारा तो पहिला फलंदाज ठरलाय.
राहुलने नागपूरच्या जामठा स्टेडियमवर रविवारी तुफानी खेळी करताना ७१ धावा केल्या. यावेळी त्याने वीरेंद्र सेहवागचाही रेकॉर्ड मोडला. सेहवागने १९ सप्टेंबरला २०७मध्ये डर्बनमध्ये इंग्लंडविरुद्ध ६८ धावांची खेळी केली होती.
राहुलने ४७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ७१ धावा केल्या. तो जॉर्डनच्या चेंडूवर स्टोक्सच्या हाती कॅच देत बाद झाला. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने १४४ धावसंख्येपर्यंत मजल मारली.