राजकोट : राजकोट टेस्टच्या चौथ्या दिवसाअखेरीस इंग्लंडनं बिनबाद 114 रनपर्यंत मजल मारली आहे. यामुळे आता इंग्लंडकडे 163 रनची आघाडी आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कूक नाबाद 46 तर हमिद नाबाद 62 रनवर खेळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी चौथ्या दिवसाची सुरुवात 319/4 अशी करणाऱ्या भारताला 488 रनपर्यंत मजल मारता आली. यामुळे इंग्लंडला 49 रनची आघाडी मिळाली. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे आऊट झाल्यानंतर वृद्धीमान सहा आणि अश्विननं भारताला सावरलं. अश्विननं 70 रनची तर सहानं 35 रनची महत्त्वपूर्ण खेळी केली.