रविंद्र जडेजाची नवी इनिंग
आयपीएलच्या गुजरात लायन्स संघाचा खेळाडू रविंद्र जडेजा आज मुंबईविरुद्ध होणारी आयपीएलची मॅच खेळणार नाही.
मुंबई: आयपीएलच्या गुजरात लायन्स संघाचा खेळाडू रविंद्र जडेजा आज मुंबईविरुद्ध होणारी आयपीएलची मॅच खेळणार नाही. रविंद्र जडेजाचं रविवारी रिवा सोलंकीबरोबर राजकोटमध्ये लग्न होणार आहे. त्यामुळे तो हा सामना खेळणार नाही. रविवारी संध्याकाळी होणाऱ्या रिसेप्शनला गुजरात संघाचे खेळाडू उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
21 तारखेला हैदराबादविरुद्धच्या सामन्यामध्येही जडेजा खेळेल का नाही, याबाबत साशंकता आहे. हा सामना राजकोटमध्येच होणार असल्यामुळे जडेजा या सामन्यासाठी उपलब्ध असेल अशी अपेक्षा गुजरातच्या संघाला आहे.
आयपीएलच्या या सिझनमध्ये गुजरातनं आत्तापर्यंत 2 पैकी 2 मॅच जिंकल्या आहेत. पुण्याविरुद्धच्या मॅचमध्ये जडेजानं चांगली कामगिरी केली होती. त्यानं 4 ओव्हरमध्ये 18 रन देऊन 2 विकेट घेतल्या होत्या.