हैदराबाद :  रियो ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल विजेती पी. व्ही. सिंधू हिची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली आहे. दरम्यान, असे असले तरी तिची प्रसिद्धी कॅच करण्यासाठी अनेक कंपन्यांना पुढे सरसावल्यात. त्यांच्यात सिंधूसोबत करार करण्यासाठी स्पर्धा दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार बॅडमिंटनपटूसोबत करार करून आपली ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढवण्यासाठी अनेक कंपन्या प्रयत्न करत आहेत. सिंधूच्या ब्रॅण्ड व्यवस्थापनाचे संचालक रामकृष्णन आर. यांनी सांगितले, काही करार हे ऑलिम्पिक स्पर्धेच्या आधीच करण्यात आले आहेत. मात्र स्पर्धेच्या तयारीत सिंधू व्यस्त असल्याने घोषणा केलेली नव्हती. सप्टेंबरच्या दुसऱ्या अठवड्यात याची घोषणा होऊ शकते.


दरम्यान, रामकृष्ण यांचीच कंपनी किदाम्बी श्रीकांत याचे देखील काम पाहते. सिंधूसाठी आम्हाला अनेक प्रस्ताव मिळाले आहेत. मात्र ब्रॅण्ड बनण्यासाठी वेळ लागतो. मात्र आम्ही हळूहळू पुढे जात आहोत, असे रामकृष्णन आर. यांनी सांगितले. 


ऑलिम्पिकनंतर सिंधूची ब्रॅण्ड व्हॅल्यू 2 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. सुरुवातीला तिची 20 ते 30 लाख रुपये ब्रॅण्ड व्हॅल्यू होती. ती आता 2 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.