रिओ दि जेनेरिओ : नाशिकच्या दत्तू भोकनळलनं भारताला ऑलिम्पिकमध्ये चांगली सुरुवात करुन दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानं 'नौकानयन' या क्रीडा प्रकारातील सिंगल स्कल्स प्रकारात पहिल्या फेरीत तिसरा येत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारलीय. दत्तूनं २ हजार मीटरचं अंतर ७ मिनिट २१.६७ सेकंदांमध्ये पार करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. 


दत्तू पहिल्या पाचशे मीटर अंतरापर्यंत दुसऱ्या स्थानी होता. मात्र, त्यानंतर मॅक्सिकोच्या कार्लस कॅब्रेरानं चांगलाच वेग पकडत दुसरा क्रमांक पटकावला तर क्युबाच्या खेळाडूनं पहिला क्रमांक पटकावला. 


आता, उपांत्यपूर्व फेरीच्या लढती ९ ऑगस्टला होणार आहेत. 'नौकानयन'मध्ये एकेरी प्रकारात दत्तू पहिला भारतीय असून तो आता मेडल पटकावून नवा इतिहास रचतो का? याकडेच साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलंय.