मुंबई : ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये राफेल नदालवर मात करत फेडररनं तबब्ल पाच वर्षांनी आपला ग्रँडस्लॅम विजयाचा दुष्काळ संपवला... यानंतर बोलताना आपल्या नंबर वन फॅनची त्यानं तोंडभरून स्तुती केली.


...तेव्हाही ती सोबत होती!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही नंबर वन फॅन म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून त्याची पत्नी मार्का होय... मार्कानं क्षणाक्षणाला दिलेल्या साथीबद्दल त्यानं तिचे आभार मानले. 'माझ्याकडे कोणतंही पदक नव्हतं तेव्हाही ती सोबत होती... आणि आज 89 पदकांनंतरही ती माझ्यासोबत आहे. तिचा या यशात खूप मोठा वाटा आहे - तिला ते माहीत आहे, मला ते माहीत आहे, सगळ्यांनाच ते माहीत आहे' असं म्हणत तो भावूक होताना अनेकांनी पाहिला. आपल्यासाठी कुटुंब हे सर्वप्रथम असल्याचंही फेडररनं यावेळी नमूद केलं. 

रॉजर आणि मार्क 2009 साली विवाहबंधनात अडकले. त्यांना दोन जुळ्या मुली आणि दोन जुळी मुलं अशी चार अपत्यं आहेत.  


मार्का आणि रॉजर


मार्का टेनिसकोर्टवर

अनेकांना माहीत नसेल, पण मार्का ही देखील टेनिसपटू आहे. 2000 साली तिची रॉजरशी सिडनी ऑलिम्पिक दरम्यान पहिली भेट झाली होती... त्यानंतर 2002 साली हॉपमॅन कपच्या मिक्स्ड डबलमध्ये या दोघं एकत्र खेळले होते. परंतु, पायाला झालेल्या दुखापतीनंतर मार्कानं नाइलाजानं टेनिसला रामराम केला. 


पण, टेनिस खेळाडू असल्यानं ती मला उत्तमरितीनं समजू शकते, हे फेडररनंही मान्य केलंय. तीच त्याचं सगळं शेड्युल आणि स्पॉन्सरशीप हॅन्डल करते... अनेकदा लांबच्या प्रवासातही ती फेडररच्या सोबतच असते.