अखेरच्या षटकांमध्ये रोहितने गोलंदाजांना दिला होता हा सल्ला
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने तिसऱ्यांदा आयपीएलचे तिसरे जेतेपद मिळवले. पुण्याविरुद्धचा हा सामना चुरशीचा झाला.
हैदराबाद : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने तिसऱ्यांदा आयपीएलचे तिसरे जेतेपद मिळवले. पुण्याविरुद्धचा हा सामना चुरशीचा झाला.
सामन्यात कधी पारडे पुण्याच्या बाजूने झुकत होते तर कधी मुंबईच्या बाजूने. मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईने बाजी मारली. या विजयाचे श्रेय रोहितने गोलंदाजांना दिलेय.
विजयाचे मोठे श्रेय गोलंदाजांना जाते. जेव्हा तुमच्या संघात जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगासारखे गोलंदाज असतील तर तुम्हाला विश्वास असतोच. आमच्या स्पिनर्सनी संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी केली.
सामन्यातील तीन महत्वाच्या ओव्हर शिल्लक होत्या. मात्र माझा गोलंदाजांवर पूर्ण विश्वास होता. जिथेही ते खेळलेत त्यांनी त्यांचे काम चोख बजावलेय. मला हेच स्वातंत्र्य त्यांना यावेळीही द्यायचे होते. त्यामुळे त्यांना जसे खेळायचे तसे खेळा आणि आपल्या हिशोबाने फिल्ड सेट करा असे मी त्यांना सांगितले, असे रोहित म्हणाला.