मुंबई : 2004 मध्ये पाकिस्तानमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान टेस्ट सामना सुरु होता. त्या सामन्यामध्ये सेहवागने ३०० रन केले होते आणि असं करणारा तो पहिला भारतीय ठरला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण या सामन्यादरम्यान खूप वाद झाला होता. त्या सामन्यामध्ये दुखापतीमुळे गांगुलीच्या जागी द्रविडला कर्णधार करण्यात आलं होतं. सचिन तेंडुलकर देखील १९४ रनवर खेळत होता आणि त्याची डबल सेंच्युरी होईल अशा अपेक्षेने सगळे ती मॅच पाहत होते पण तसं नाही झालं. द्रविडने अचानक डाव घोषित केला आणि विवादाला सुरुवात झाली. 


भारताचा स्कोर दुसऱ्या दिवशी ५ विकेट गमावत 675 रन होता. सचिनची डबल सेंच्युरी फक्त ६ रनमुळे हुकली. भारत जर अजून एक ओव्हर खेळला असता तर सचिनचे २०० रन पूर्ण झाले असते. पण द्रविडने कोणालाच नाही सांगितलं की त्याने असं का केलं. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यात नंतर वाद झाल्याच्या चर्चा होत्या. पण यावर सचिनने स्पष्टीकरण दिलं आहे. सचिनने म्हटलं की आम्ही चांगले मित्र आहोत. भारतासाठी नेहमी चांगली खेळी केली.


पाहा अजून काय बोलला सचिन तेंडुलकर


<