मुंबई : क्रिकेटच्या मैदानामध्ये स्लेजिंगचे आरोप आपण वारंवार ऐकतो. विराट कोहलीपासून ते हरभजन सिंगपर्यंत जवळपास सगळ्याच खेळाडूंवर हे आरोप झाले आहेत. पण ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ग्लेन मॅकग्रानं सचिन तेंडुलकरचं नाव स्लेजिंगच्या वादामध्ये ओढलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकरनं माझ्याबरोबर स्लेजिंग केलं. जगातल्या सगळ्याच टीम स्लेजिंग करतात, पण बातम्या फक्त ऑस्ट्रेलियन टीमनं स्लेजिंग केल्याच्या येतात, असं मॅग्रा म्हणाला आहे. दुसऱ्या टीम ऑस्ट्रेलियाला स्लेज करतात तेव्हा आम्ही शांत बसतो, पण ऑस्ट्रेलियानं स्लेजिंग सुरु केल्यावर ते खेळाडू अंपायरकडे तक्रार करतात, अशी प्रतिक्रिया मॅकग्रानं दिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीममधून मॅथ्यू हेडन सर्वाधिक स्लेजिंग करायचा असंही मॅग्रा म्हणाला आहे.