मुंबई : क्रिकेटमधलं एक मोठं नाव म्हणजे सचिन तेंडुलकर. आज सचिनचा ४३ वा वाढदिवस. सोशल मीडियावर सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तुम्हालाही हे जाणून घ्यायला आवडेल की सचिनने आजच्या दिवसाची सुरुवात कशी केली असेल.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंदुलकरने त्याच्या वाढदिवशी एमआइजी क्रिकेट क्लबमध्ये मुलांसोबत क्रिकेट खेळतांना दिसला. २ वर्षापूर्वी सचिनने क्रिकेटला अलविदा केलं होतं. आज जगभरात सचिनचे लाखो चाहते आहेत. त्यांना देखील ही गोष्ट नक्की आवडली असेल.


क्रिकेटचा देव असं देखील सचिनला म्हटलं जातं. २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईत एका साधारण घरात सचिनला जन्म झाला होता. सचिनला क्रिकेट खेळण्यात लहानपणापासूनच एवढा रस होता की पुढे जावून तिच त्याची ओळख बनली.