सचिनने सांगितली...सचिन...सचिन स्लोगनची कहाणी
या घोषणेची सुरूवात कधी झाली हे सचिनने एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितलं आहे. सचिनवर, सचिन अ बिलियन ड्रीम्स, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई : सचिन तेंडुलकरच्या सचिन...सचिन.... या घोषणेची सुरूवात कधी झाली हे सचिनने एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितलं आहे. सचिनवर, सचिन अ बिलियन ड्रीम्स, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटातून मास्टर ब्लास्टरच्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दल उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळते आहे. अशा या महत्त्वाकांक्षी चित्रपटातील सचिन.. सचिन हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
या गाण्याची ध्वनिचित्रफीत मंगळवारी प्रथमच दाखवण्यात आली. या प्रसंगी सचिन.. सचिन.. हा नारा तू पहिल्यांदा कधी ऐकलास, असा प्रश्न विचारल्यावर सचिनने लगेच उत्तर दिले. वांद्रेमधील कलानगर येथे मी राहत असताना मी इमारतीखाली क्रिकेट खेळायचो, त्या वेळी आई घरी बोलवण्यासाठी अशी हाक द्यायची, सचिन...सचिन...त्यापासून या गोष्टीची सुरुवात झाली, असे सचिनने म्हटलंय.