रिओ डि जानिरो : रिओत साईना नेहवालचा अखेर पराभव झाला आहे. भारताच्या साईना नेहवालला जागतिक क्रमवारीत ६१ व्या स्थानावर असलेल्या युक्रेनच्या मारिया युलेटिना हिने  पराभूत केलंय. या पराभवामुळे साईनाचे रिओ ऑलिंपिकमधील आव्हान संपुष्टात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक क्रमवारीत साईना पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र ऑलिंपिकमधील आजच्या सामन्यात साईनाला सरळ सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला. 


पहिला गेम २१-१८ असा गमावल्यानंतर साईनासाठी दुसरा गेम महत्त्वाचा होता. पण यातही मोक्याच्या क्षणी चुका केल्याने या गेममध्ये तिला २१-१९ असा पराभव स्वीकारावा लागला. 


पहिल्या गेममध्ये साईनाने सुरवातीला पाच गुणांची आघाडी घेतली होती. पण नंतर टाळता येण्यासारख्या चुका करत मारियाला पुनरागमनाची संधी दिली. मारियाने आपल्या उंचीचा चांगला उपयोग करून घेत साईनाला वर्चस्व मिळविण्याची संधीही दिली नाही.