मुंबई : स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात लवकरच दिसणार आहे. सायनाचा लकी चार्म कोण आहे, हे तुम्हाला माहित आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचा खुलासा खुद्द सायनानंच केलाय. सायनाच्या म्हणण्यानुसार, कपिल शर्मा हा तिच्यासाठी तिचा 'लकी चार्म' आहे... कपिल आपल्यासाठी खूपच भाग्यशाली आहे असं सायनाला वाटतं.



का ठरलाय कपिल सायनासाठी लकी चार्म?


२०१४ साली नोव्हेंबर महिन्यात सायनानं चीन ओपन खिताब आपल्या नावावर नोंदवला होता. या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी याच महिन्यात सायना कपिलच्या तेव्हाच्या 'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या कार्यक्रमात दिसली होती.


यंदाही कपिलच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची सायनाची इच्छा आहे.