नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीत भारताची कास्यपदक विजेती साक्षी मलिकचं दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी, बेटी बचाव, बेटी पढाव, बेटी खिलाव, असा नवा संदेश साक्षीनं यावेळी दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साक्षी मलिकनं गेल्या 12 वर्षात केलेल्या मेहनतीचं चीज झालं असंही यावेळी म्हटलंय.   रोहतकमध्ये  साक्षीचा जाहीर सत्कार करण्यासाठी हरियणाचे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर  उपस्थित होते. आज पहाटे साक्षीचं दिल्ली विमानतळावर आगमन झालं. त्यावेळी विमातळावर ढोल ताशांच्या गजरात जल्लोषाचं वातावरण होतं. 


यावेळी साक्षीच्या कुटुंबियांसोबत हरियाणा सरकारचे ज्येष्ठ मंत्री अनिल विज आणि हरियाणा भाजपचे अनेक वरिष्ठ कार्यकर्तेही विमानतळावर उपस्थित होते.