मुंबई :  महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरसह खेळ जगतातील अनेक ताऱ्यांनी ब्रॉन्झ मेडल विजेती साक्षी मलिकचे तोंडभरून कौतुक केले. 


सचिन तेंडुलकर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेंडुलकर म्हणाला की, संपूर्ण देशाला साक्षीचा अभिमान आहे. रिओ ऑलिम्पिकचे ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या तेंडुलकरने ट्विट केले की, सकाळी उठल्यावर काय शानदार बातमी मिळाली. साक्षी मलिकने रिओ ऑलिम्पिकमध्ये संयम आणि धैर्याने सर्व देशाला गौरव प्राप्त करून दिला. खूप खूप अभिनंदन...


अभिनव बिंद्रा 


भारतासाठी ऑलिम्पिकच्या वैयक्तीक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा एक मात्र खेळाडू अभिनव बिंद्रा म्हटला की 'साक्षी मलिकचे अभिनंदन, काय शानदार कामगिरी केली. प्रत्येक भारतीयाचा मनोबल वाढले आहे. धन्यवाद. 


सुशील कुमार 


ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तीक पदक मिळवणारा भारतीय पहेलवान सुशील कुमारने साक्षीचे अभिनंदन करताना म्हटले की, तिने असे काही केले आहे जे कोणत्याही भारतीय मुलीला जमले नाही. खरी हिरो, साक्षी मलिक, तू अनेकांसाठी रस्ते खुले केले आहे. ते तुझे अनुकरण करतील. 


मेरी कोम


लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल विजेतील बॉक्सर एम सी मेरी कॉमने अभिनंदन केले आहे. मेरी म्हणाली, अभिनंदन साक्षी मलिक, रिओ ऑलिम्पिक, खेलो इंडिया, 


विजेंदर सिंग 


तर बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकणारा विजेंदर सिंहने साक्षी हरियाणवीमध्ये ट्विट केले. विजेंदर म्हटला साक्षी मलिकच्या आईला सलाम तिने साक्षीला कुस्तीत जाण्यास प्रेरित केले. आज सव्वा करोड लोक आनंदोत्सव करत आहेत. 


कमाल कर दिया छोरीने, क्या बोलते हो लठ गाड दिया... असंही ट्विट विजेंदरने केले