भारताची पदकाची प्रतिक्षा संपली, साक्षी मलिकला कुस्तीत ब्राँझ
ऑलिम्पिकमध्ये भारतानं मेडलचं खातं उघडलं आहे.
रिओ: ऑलिम्पिकमध्ये भारतानं मेडलचं खातं उघडलं आहे. कुस्तीमध्ये साक्षी मलिकनं ब्राँझ मेडल जिंकत रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं-वहिलं मेडल जिंकून दिलं.
साक्षीनं 58 किलो वजनीगटात किर्गिस्तानच्या आयसूलू तायनाबेकोव्हर मात करत ब्राँझ मेडलची कमाई केली. कुस्तीमध्ये ब्राँझ मेडल पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
रिपेचाजमुळे तिला ब्राँझ मेडलच्या मुकाबला खेळण्याची संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करत साक्षीनं मेडल जिंकलं. याआधी 2008 मध्ये सुशील कुमारनं रिपेचाजची लढत जिंकत भारताला ब्राँझ पटकावून दिलं होतं.
भारताचं कुस्तीमधील हे पाचवं मेडल ठरलं आहे. याआधी खाशाबा जाधव यांनी ब्राँझ, सुशील कुमारनं 2008 मध्ये ब्राँझ आणि 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर तर योगेश्वर दत्तनं 2012मध्ये ब्राँझ मेडलची कमाई करून दिली होती.