रिओ : भारताचे टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या भारतीय जोडीला मिक्स डबल्सच्या सेमी फायनलमध्ये पराभव सहन कारावा लागला. अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्स आणि राजव राम जोडीनं त्यांना 6-2, 2-6, 3-10 नं पराभवाचा धक्का दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टेनिस जोडी सेमीमध्ये पराभूत झाली असली तरी त्यांच्या पदकाच्या आशा कायम आहेत. आता ब्राँझ मेडलसाठी सानिया-बोपन्नाचा मुकाबला चेक रिप्बलिकच्या लुसी हार्डेका आणि राडेक स्टेपानेकशी होणार आहे. 


1996 अटलांटा ऑलिम्पिकमधअये लिअँडर पेसनं टेनिसनमध्ये भारताला वैयक्तिक ब्राँझ पटकावून दिलं होतं. आता सानिया-बोपन्ना भारताला मिक्स डबल्सम्ध्ये ब्राँझ मेडल जिंकून देतील अशी आशा आहे.