भारत-इंग्लड पहिल्या कसोटीवरील संकट दूर
उद्यापासून सुरू होणाऱ्या भारत वि इंग्लंड कसोटीवरील संकट टळलेय. सुप्रीम कोर्टाने राजकोट कसोटीसाठी ५६ लाख रुपयांचा निधी देण्यास परवानगी दिलीये.
नवी दिल्ली : उद्यापासून सुरू होणाऱ्या भारत वि इंग्लंड कसोटीवरील संकट टळलेय. सुप्रीम कोर्टाने राजकोट कसोटीसाठी ५६ लाख रुपयांचा निधी देण्यास परवानगी दिलीये.
लोढा समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी झाल्याशिवाय राज्याच्या क्रिकेट बोर्डांना निधी वाटप करण्यास कोर्टानं मनाई केली होती. निधी वाटपाची परवानगी मिळवण्यासाठी बीसीसीआयने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निधी वाटप झाला नाही तर भारत-इंग्लंड कसोटी रद्द करावा लागेल असा युक्तीवाद बीसीसीआयने कोर्टात केला होता.
बीसीसीआयच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने ५६ लाख रुपयांचा निधी देण्याची परवानगी दिलीये. तसेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील इतर सामन्यांसाठी निधी देण्याची परवानगी देण्यात आलीये.
.