धोनीच्या नेतृत्वावर सेहवागची टीका
टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. 192 रन करुनही भारताला ही मॅच जिंकता आली नाही, यावरुन आता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं धोनीच्या कॅप्टनशिपवर टीका केली आहे.
मुंबई: टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. 192 रन करुनही भारताला ही मॅच जिंकता आली नाही, यावरुन आता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं धोनीच्या कॅप्टनशिपवर टीका केली आहे.
क्रिकबझ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये सेहवागनं धोनीच्या कॅप्टनशिपवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक कारणांपैकी धोनीनं केलेलं नेतृत्व या पराभवाला जबाबदार आहे, असं सेहवाग म्हणाला आहे.
धोनी हा चांगला कॅप्टन आहे, पण त्यादिवशी त्यानं चांगली कॅप्टनशिप केली नाही. अश्विन हा भारताचा सगळ्यात महत्त्वाचा बॉलर आहे, तरी त्याला 2 ओव्हरच का देण्यात आल्या, असा प्रश्न सेहवागनं उपस्थित केला आहे.
अश्विन आणि हार्दिक पांड्याच्या त्या 2 नो बॉलमुळे भारताचा पराभव झाला, असंही सेहवाग म्हणाला आहे. मुंबईमध्ये मॅच खेळत असताना दव असल्यामुळे बॉलिंग करणं कठीण होतं, मग भारतीय बॉलर्सनी दव लागलेल्या बॉलनी प्रॅक्टीस केली का असंही सेहवागनं विचारलं आहे.
काय म्हणाला सेहवाग, पाहा हा व्हिडिओ