मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग सध्या त्याच्या ट्विटमुळे जोरदार चर्चेमध्ये आहे. भारताचा माजी फास्ट बॉलर व्यंकटेश प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सेहवागनं असंच एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सेहवागनं पाकिस्तानला डिवचलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसादला शुभेच्छा देताना सेहवागनं 1996 च्या वर्ल्ड कपमधलं प्रसाद आणि आमिर सोहेलचं भांडण आठवून दिलं. त्या मॅचमध्ये प्रसादला फोर मारल्यानंतर सोहेलनं प्रसादला चिडवलं, यानंतर दुसऱ्याच बॉलला प्रसादनं सोहेलला बोल्ड केलं.   


हॅपी बर्थडे व्यंकटेश. 96 च्या वर्ल्डकपमध्ये आमिर सोहेलला बोल्ड करून तू भारतीयांना दिलेला प्रसाद अजूनही आमच्या लक्षात आहे, असं ट्विट सेहवागनं केलं आहे.