अहमदाबाद : कबड्डी वर्ल्डकपमध्ये आज सेमीफायनलच्या मॅचेस रंगणार आहेत. भारत, थायलंड, साऊथ कोरिया आणि इराण हे चार संघ सेमीफायनलमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यजमान भारताची लढत थायलंडशी होणार आहे तर दुसऱ्या लढतीत साऊथ कोरिया आणि इराण हे संघ आमनेसामने येणार आहेत. 7 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपचा रणसंग्राम सुरु झाला होता. 


या सेमीफानल्सच्या मॅचेसमधील दोन विजेते फायनलमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. भारत विरुद्ध थायलंडच्या सामन्यात यजमान भारताचे पारडे जड असले तरी थायलंडला कमी लेखून चालणार नाही. ग्रुप बीमध्ये 5 पैकी 4 सामने जिंकत थायलंड अव्वल स्थानी आहे. त्यामुळे भारताच्या कबड्डीपटूंची या सामन्यात चांगलीच कसोटी लागणार आहे.