नवी दिल्ली : सेरेना विल्यम्सनं आपली बहिण व्हीनस विल्यम्सवर मात करत सातव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी घातली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेरेनानं फायनलमध्ये व्हीनसचा 6-4, 6-4 नं पराभव केला. या विजेतेपदासह तिनं आपल्या टेनिस करिअरमध्ये 23 वं ग्रँडस्लॅम जिंकण्याची किमया साधली.


सेरेनानं स्टेफी ग्राफचा 22 ग्रँडस्लॅम विजेतेपदाच विक्रम मोडित काढत नवा इतिहास रचला. ओपन एरामध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारी ती एकमेव टेनिसपटू ठरली आहे.


मार्गारेट कोर्ट यांच्यावर नावावर 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर सेरेना पुन्हा अव्वल स्थानी विराजमान झाली आहे.