गार्बिन मुगुर्झा फ्रेंच ओपनची विजेती
प्रबळ इच्छाशक्तीला कठोर मेहनतीची जोड लाभली की यश मिळतेच. फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत असेच काहीसे पाहायला मिळाले.
पॅरिस : प्रबळ इच्छाशक्तीला कठोर मेहनतीची जोड लाभली की यश मिळतेच. फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत असेच काहीसे पाहायला मिळाले.
फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत २२ वर्षीय स्पेनच्या गार्बिन मुगुर्झासमोर आव्हान होते ते गाठीशी प्रचंड अनुभव, उर्जा आणि आत्मविश्वास असलेल्या सेरेना विल्यम्सचे.
मात्र गार्बिनने उत्तम खेळाच्या जोरावर सेरेनाला 7-5, 6-4 असा सरळ सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. मुगुर्झानं फ्रेंच ओपन जेतेपदासह आपलं पहिलंवहिलं ग्रँड स्लॅम पटकावलंय.
ग्रँडस्लॅममधील अंतिम फेरीत झालेला सेरेनाचा हा दुसरा पराभव ठरलाय. याआधी अमेरिकन ओपनमध्येही सेरेनाला अंतिम फेरीत पराभवाचा धक्का बसला होता.