नवी दिल्ली : अमेरिकेची टेनिसस्टार सेरेना विल्यम्सने सोशल मीडिया वेबसाईट रेडिटवर आपल्या साखपुड्याची घोषणा केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेरेनाने रेडिटचा सह-संस्थापक अॅलेक्सिस ओहानियनसोबत साखरपुडा केलाय. सेरेनाने रेडिटवर कवित पोस्ट करत आपल्या साखरपुड्याची घोषणा केली.


रोममध्ये सेरेना आणि अॅलेक्सिस यांचे सूत जुळले. येथेच अॅलेक्सिसने तिला लग्नासाठी मागणी घातली आणि तिने लगेचच होकार दिला. 


२०१६ हे वर्ष या टेनिसस्टारसाठी चांगले राहिले. सेरेनाने सातवे विम्बल्डन जेतेपद मिळवले आणि २२वे ग्रँड स्लॅम आपल्या नावे केले.