मुंबई: आयपीएल सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सना मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू लसिथ मलिंगा आयपीएल खेळू शकणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलिंगाच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्या आयपीएलमधल्या सहभागाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आयपीएलच्या पहिल्या भागामध्ये मलिंगाला खेळता येणार नाही, अशी प्रतिक्रिया मुंबईचा कोच रिकी पॉईंटिंगनं दिली आहे. 


 


मागच्या नोव्हेंबरपासून मलिंगा गुडघ्याच्या दुखण्यानं त्रस्त आहे. आशिया कपमध्ये मलिंगाला फक्त एकच मॅच खेळता आली, तर टी 20 वर्ल्ड कपही मलिंगाला खेळता आला नाही. आयपीएलमध्ये लसिथ मलिंगाहा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे.