मुंबई : एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा शरद पवार यांनी राजीनामा दिला आहे. लोढा समितीनं दिलेल्या शिफारसींमुळे शरद पवार यांना राजीनामा द्यावा लागला आहे.


काय आहेत लोढा समितीच्या शिफारसी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेली व्यक्ती बीसीसीआय किंवा स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या पदावर राहू शकत नाही, तसंच क्रिकेट समितीमध्ये नऊ वर्ष पूर्ण केल्यावरही सदस्य अपात्र होईल, असं लोढा समितीच्या शिफारसींमध्ये आहे.


लोढा समितीनं एक राज्य एक मत याचीही शिफारस केली होती. महाराष्ट्रामध्येच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, मुंबई क्रिकेट असोसिएशन, विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया या समित्या आहेत.