नवी दिल्ली : शशांक मनोहर यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आयसीसी) च्या अध्यक्षपदी यांची निवड झालीये. मनोहर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोहर हे आयसीसीचे पहिले स्वायत्त अध्यक्ष बनलेत. सर्वांच्या सहकार्याने क्रिकेटची सेवा करणार असल्याचे मनोहर यांनी स्पष्ट यावेळी स्पष्ट केलं.


पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी मनोहर यांची निवड करण्यात आलीये. नुकताच १० मेला त्यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 


जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर ऑक्टोबर २०१५मध्ये मनोहर यांनी बीसीसीआय अध्यक्षपद स्वीकारले होते.