मुंबई : शशांक मनोहर यांनी आयसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपण वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचंही शशांक मनोहर यांनी स्पष्ट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीचे पहिले स्वतंत्र चेअरमन म्हणून शशांक मनोहर यांची १२  मे २०१६ रोजी  निवड झाली होती. शशांक मनोहर यांचा कार्यकाळ २ वर्षाचा होता.


महत्त्वाचं म्हणजे शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी  दिला होता. मात्र आज शशांक मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.