नवी दिल्ली : नुकतीच इंडियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावावर करणारी पी.व्ही. सिंधू आणि भारताची फुलराणी सायना नेहवालला मलेशिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत धक्का बसलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्याच फेरीत या दोघांना पराभवास सामोर जावे लागल्याने त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. दरम्यान, पुरुष एकेरीत मात्र अजय जयरामने पुढील फेरीत वाटचाल केलीये.


रिओ ऑलिंपिक कांस्यपदत विजेती सिंधूला चीनच्या चेन युफेईकडू १८-२१, २१-१९, २१-१७ असा पराभवाचा धक्का बसला. तर सायनाला जपानच्या बॅडमिंटनपपूटने १९-२१,  २१-१३, २१-१५ असे हरवले.