नवी दिल्ली : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ सामन्यांची सिरीजमध्ये हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सिरीज संपल्यानंतर ऑस्ट्रेलियचा कर्णधार स्टीव स्मिथने भारतीय टीमसोबत पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला. स्टीव स्मिथची आयपीएलमधल्या त्याच्या टीममधला खेळाडू अंजिक्य रहाणे आणि भारतीय टीमच्या इतर खेळाडूंना भेटण्यासाठी पोहोचला आणि त्यांना बियर ऑफर केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीरीज संपल्यानंतर स्मिथने त्याच्या भावनेवर नियंत्रण न मिळवू शकल्याने माफी मागितली आहे आणि भारतीय कर्णधारासोबत त्याने चर्चा ही केली.


आयपीएल टीम राइजिंग पुणे सुपरजाइंट्सचा कर्णधार स्मिथने एबीसी ग्रँडस्टँडला म्हटलं की, मी रहाणेला म्हटलं की पुढच्या आठवड्यात भेटू. तो आयपीएलमध्ये माझ्या टीममध्ये आहे.


'मी सीरीजनंतर अजिंक्यला ड्रिंक करण्यासाठी खेळडूंसह बोलवलं. त्याने म्हटलं की, तो त्यांच्याशी बोलेल. अंजिक्यसोबत माझे चांगले संबंध आहे. तो माझ्या टीममध्ये आहे आणि पुढच्या आठवड्यात त्याच्या सोबत असेल.'