मुंबई : आयपीएलचा यंदाचा सिझन दाखवणाऱ्या सोनीला जाहिरातींमधून १,२०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही रक्कम २० टक्के जास्त आहे. २०१५ मध्ये सोनीला जाहिरातींमधून १,००० कोटींचा महसूल मिळाला होता. २०१६मध्ये सोनीनं जाहिरातींचे दर १५ टक्क्यांनी वाढवले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनीच्या महसुलामध्ये वाढ झाली असली तरी यंदा आयपीएल टीव्हीवर बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या घटली आहे. या वर्षी सोनीनं हिंदी, इंग्लिश आणि काही प्रादेशिक भाषांमध्ये आयपीएलच्या मॅच दाखवल्या. 


आयपीएलच्या मॅच दाखवण्याचे अधिकार सोनीकडे पुढचं वर्ष म्हणजेच २०१७ पर्यंत आहेत.