PHOTO : CM च्या मुलाचा बॉलिवूडमध्ये डंका, 16 व्या वर्षी पडला प्रेमात, 9 वर्ष लहान अभिनेत्रीशी लग्न, 132 कोटींचा संपत्ती

Entertainment : फोटोमधील एक चिमुकल्याला लहानपणापासून राजकारणाचा वारसा मिळाला. पण त्याला आर्किटेक्ट व्हायचं होतं, शिवाय नशिबात बॉलिवूडचं क्षेत्र होतं. अभिनेता असो किंवा खलनायक सगळ्याच प्रकारचे अभिनय त्याने केले. विनोदात तर त्याचा हातखंड आहे. तुम्ही या कलाकाराला ओळखलं का?

| Dec 16, 2024, 22:29 PM IST
1/7

अभिनेत्याने मराठीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत आपला डंका गाजवलाय. 17 डिसेंबरला अभिनेता त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करतोय. आता तरी तुम्हाला ओळखता आलं का आम्ही कोणत्या अभिनेत्याबद्दल बोलतोय ते. 

2/7

तुझे मेरी कसम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा हा अभिनेता आहे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुख. या चित्रपटात त्याची पत्नी जिनिलीया डिसूझा काम केलं होतं. या चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली नव्हती. मस्ती या चित्रपटातून अभिनेत्याला रातोरात ओळख मिळाली. 

3/7

अभिनेता असण्यासोबतच रितेश आर्किटेक्ट देखील आहे. त्याने मुंबईच्या कमला रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून आर्किटेक्चरची पदवी घेतली आहे. इतकंच नाही तर, अभिनेता असण्याबरोबरच रितेश एका आर्किटेक्चरल आणि इंटीरियर डिझायनिंग फर्मचा मालक देखील आहे.

4/7

2013 मध्ये ‘मुंबई फिल्म कंपनी’ नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. 1014 मध्ये दिवंगत निर्माते निशिकांत कामत निर्मित 'लय भारी' या चित्रपटाद्वारे रितेशने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर वेड या चित्रपटातून नवरा बायकोने सर्वांना वेड लावलं. 

5/7

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा हे पॉवर कपल म्हणून पाहिले जातात. 9 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केलं. फार कमी लोकांना माहितीय या दोघांची भेट पहिल्यांदा विमानतळावर झाली. 

6/7

रितेशला भेटण्यापूर्वी जेनेलियाच्या मनात अभिनेत्याची पूर्णपणे वेगळी प्रतिमा होती. रितेश राजकीय कुटुंबातील होता. जेनेलियाला रितेश हा मुख्यमंत्र्यांचा बिघडलेला मुलगा वाटत होता. पण जेव्हा त्यांनी 'तुझे मेरी कसम' चित्रपटात एकत्र काम केले तेव्हा त्यांना कळले की रितेश देशमुख तसा अजिबात नाही. तो एक चांगला माणूस आहे. रितेश देशमुख जेनेलिया डिसूजापेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे. 

7/7

रितेश देशमुखचा संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर ती 132 कोटींच्या घरात आहे. चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट आणि प्रॉडक्शन हाऊसमधून त्याची मुख्य कमाई येते.