दिल्ली: वर्ल्ड टी 20च्या पहिल्या ग्रुपच्या मॅचमध्ये इंग्लंडनं श्रीलंकेचा 10 रननी पराभव केला आहे. यामुळे श्रीलंकेबरोबरच दक्षिण आफ्रिकेचंही सेमी फायनलमध्ये जायचं स्वप्न भंगलं आहे, तर इंग्लंडनं सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचनंतर पहिल्या ग्रुपमधले दोन्ही सेमी फायनलिस्ट ठरले आहेत. वेस्ट इंडिजनं या ग्रुपमधून आधीच सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे, तर आता इंग्लंडही सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. इंग्लंड आता न्यूझीलंडबरोबर सेमी फायनल खेळेल. 


या मॅचमध्ये श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि इंग्लंडनं 20 ओव्हरमध्ये 171 रन केल्या. जॉस बटलरनं 37 बॉलमध्ये 66 रनची खेळी केली. 


172 रनचा पाठलाग करायला आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. स्कोरबोर्डवर फक्त 15 रन असताना त्यांचे 4 बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण त्यानंतर कॅप्टन अँजेलो मॅथ्यूजनं आधी कपुगदेरा आणि मग थिसारा परेराच्या मदतीनं झुंज दिली, पण त्याला श्रीलंकेला जिंकवता मात्र आलं नाही.  अँजेलो मॅथ्यूजनं 54 बॉलमध्ये 76 रन बनवले.